# 1938:  द स्टिचिंग सिस्टर्स. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
04 January 2026

# 1938: द स्टिचिंग सिस्टर्स. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us a text

गेल्या हिवाळ्यात, एक तरुण त्या काळजी केंद्राच्या स्वागत कक्षात आला. त्याने ब्लँकेट्स बनवणाऱ्या स्त्रियांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. कर्मचारी सुरुवातीला कचरले, पण त्यांनी त्याला आमच्या सनरुममध्ये आणले. त्याच्या हातात एक निळ्या-पिवळ्या रंगाचा स्कार्फ होता, ज्यामध्ये विणलेल्या विस्कळीत ओळी होत्या.
"मला हा स्कार्फ डिसेंबरमध्ये केंद्रात मिळाला होता," तो म्हणाला. त्याचा आवाज कापत होता. "मी दररोज रात्री पुलाखाली तोच पांघरून झोपायचो. त्याच्या झालरीमध्ये एक टॅग लावलेला होता: 'एलेनॉर, वय ८४, यांनी हाताने विणलेला. You are not alone- तुम्ही एकटे नाही."