
28 December 2025
# 1931: श्री दत्तात्रेयांकडून रामदास स्वामींची कठीण परीक्षा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Life of Stories
About
Send us a text
एकदा रामदास समर्थ मातापुरी (माहूर) गेले. तेथे देवीचे दर्शन घेऊन, श्रीदत्तात्रयांचे स्थान आहे, तेथे ते गेले. तोच अनुष्ठान करीत बसलेले दहापाच ब्राह्मण दिसले. त्यांस विचारले की, 'तुम्ही येथे का बसला?' तेव्हा त्यांनी उत्तर केले की, "श्रीदत्तात्रयांच्या दर्शनाकरिता अनुष्ठान करीत आहोत." ते ऐकून समर्थ बोलले की, "उत्तम आहे. तुमच्या समागमे आम्हांसही दर्शन घडेल." असे म्हणून आपणही तेथे बसले.