
About
Send us a text
मी त्याचा हात पकडला आणि नोट परत करत म्हटलं, "अरे राहू दे बाबा. फी नको. तू फक्त बाळाला औषधं घे आणि चांगलं खायला घाल."
त्यावर तो मजूर जे बोलला, त्याने माझ्या अंगावर काटा आला.
तो करारी आवाजात म्हणाला,
"नको साहेब. ही तुमची 'विद्या' हाय, आणि हे माझं कष्टाचं 'दाम' हाय. फुकट इलाज केला तर माझ्या लेकाला गुण नाही येणार. हे पैसे ठेवा, बाकीचे उद्या कामावरून सुटल्यावर आणून देतो."