# 1920:  ज्येष्ठांची कट्टा पार्टी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
17 December 2025

# 1920: ज्येष्ठांची कट्टा पार्टी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us a text

नंतर गोविंद पंत उभे राहिले, "सदाशिवने सांगितले आम्ही आता जेष्ठ आहोत. अहो, पण आपल्यातल्या बऱ्याच जणांचा बालीशपणा अजूनही आहे. आयुष्य सुंदर जगायचं तर तो खूप फायद्याचा असतो. आम्ही सुरुवातीला फक्त चार जण होतो आणि तेही पुरुषच. पण आता ह्या दोन वर्षात आपला समूह केवढा मोठा झाला बघा! त्याला कारणही ह्या सर्व आपल्या मैत्रिणी. ह्या ग्रुप मधे वेगवेगळे उपक्रम राबवतात. महिन्यातून चार पाच वेळा आपल्या खवय्या पार्ट्या असतात. त्यात आम्ही पुरुष कधी स्वयंपाक घरात घुसलो नव्हतो, आता मस्त डिशेस बनवतो. आपले सारे छंद, आवडी आमच्या संसाराच्या कामामुळे जोपासले नव्हते, ते आता पूर्ण करता आलेत.