
13 December 2025
# 1917: पंधरा सेकंदाच्या बंदिस्त जगातील ब्रेन रॅाट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Life of Stories
About
Send us a text
खरेतर बाबा आमटे म्हणाले होते “देश उभा करायला आणि बुडती नाव वाचवायला समुद्रात झोकून देणारे कॅप्टन हवे असतात.” हे कॅप्टन अंगमेहनती असले पाहिजेत, तासंतास एकाग्रचित्त होऊन वाचन करणारे अभ्यास करणारे विचारवंत असले पाहिजेत. रात्रंदिवस प्रयोगशाळेत प्रयोग करणारे शास्त्रज्ञच जपान-जर्मनीसारखे बेचिराख झालेले देश राखेतून उभा करू शकतात. पण आमचे जेंझी आणि अल्फा ज्यांच्यावर मिलनियल्सच्या म्हातारपणाच्या अपेक्षा आहेत त्यांची एकाग्रता पंधरा सेकंदावर आली आहे. आता पुढच्या पिढीतून कुठले अब्दुल कलाम आणि सीव्ही रामन...!!!
याच पिढीच्या खांद्यावर पुढचा देश, पुढचं विज्ञान, पुढचं तंत्रज्ञान उभं राहणार आहे. आणि हि पिढी कुठाय?
१५ सेकंदांच्या जगात बंदिस्त......