TechTalks Series: 12 - Big Data - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur

TechTalks Series: 12 - Big Data - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur

Sunil Khandbahale - MIT Sloan Fellow, Innovator, Entrepreneur & Research Scholar
00:03:47
Link

About this episode

TechTalks Series: 12 - Big Data - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur 


‘मायनॉरिटी रिपोर्ट’ नावाचा एक सिनेमा आहे. त्यामध्ये पोलिस अधिकारी एका गृहस्थाला अटक करताना म्हणतात, ‘आम्ही तुला अटक करत आहोत, कारण तू आज एक खून करणार होतास.’ पोलिसांना हे कसं कळलं म्हणून त्या गृहस्थाला आश्चर्य वाटत असलं तरी पोलिसांना ते पूर्वानुमानी (प्रेडिक्टिव) माहितीच्या आधारे समजलेले असते. सध्या अमेरिकेत पुढील 12 तासांत कुठे गुन्हा घडू शकतो, याचा पूर्वानुमान घेत गुन्हा घडण्याआधीच अमेरिकेतील पोलिस गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इंग्लंडमधील व्यापारी आणि शास्त्रज्ञांना गणिताच्या आधारे अब्जावधी रुपये कमावण्याचे गुपित उलगडल्याचा दावा ते करत आहेत. दक्षिण आफ्रिकेत एक खगोलशास्त्रज्ञ संपूर्ण ब्रह्मांड सूचीबद्ध करण्यात व्यग्र आहे. हे सर्व घटनाक्रम एका समांतर धाग्याने जोडले गेलेले आहेत, आणि तो धागा म्हणजे ‘बिग डाटा’. बिग डेटा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिशय वेगाने होणाऱ्या माहिती आदानप्रदानातून मोठ्या प्रमाणात तयार होणारा डिजीटल डेटा. दर दिवसाला आपण जगभरात २.५ क्विंटिलिअन डेटा तयार करत असतो. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे आजमितीला संपूर्ण जगभरात असलेला नव्वद टक्के डेटा हा मागील दोन वर्षात तयार झाला आहे. अब्जावधी फोन्स, सेन्सर्स, सोशियल मेडिया पोस्ट्स, संकेतस्थळे, डिजिटल चित्रे, चलचित्रे, दृकश्राव्य माध्यमे, ईमेल, जिपीएस आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित उपकरणं ही बिग डेटा निर्मितीची मुख्य स्रोत आहे. याच बिग डेटामुळे कंपन्या कशा चालतात, आपण खरेदी कशी करतो, हवामान अंदाज कसे नोंदवले जातात किंवा संशोधन कसे केले जाते, या सर्वांवरच परिणाम होणार आहे. असंख्य तंत्रज्ञ आणि प्रचंड वेगाने काम करणारी शक्तिशाली संगणक प्रणाली यांच्या मदतीने बिग डेटाचे पृथक्करण केले जात असून त्या आधारे अचूक अनुमान बांधले जात आहेत. गूगलवर शोधल्या जाणा-या सर्च टर्म्सचा अभ्यास करून तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात. फेसबुकवर पाठवलेल्या पोस्ट आणि लाइक्सचा अभ्यास करून उत्पादने दाखवली जातात. अमेझॉनवर तुमची वाचनाची आवड लक्षात घेऊन तुम्हाला पुस्तके सुचवली जातात. अमेझॉन, इबेवर तुम्ही नवीन काय वस्तू विकत घेणार ते दर्शवले जाते. प्रशासन स्तरावर बिग-डेटा चा उत्तम वापर करणारे एक चांगले उदाहरण म्हणजे साऊथ कोरियातील सोंगडो हे शहर. त्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि बिग डेटाचा एकत्रित वापर करून शहरातील प्रदूषण, वाहतूक, पाणीपुरवठा, ऊर्जा, कचरा, पार्किंग विषयक समस्या प्रभावीपणे सोडवल्या आहेत. नाशिकसारख्या शहरात देखील कुंभमेळ्यादरम्यान प्रशासनाने बिग डेटा चा प्रभावी वापर करत चेंगराचेंगरी सारख्या गर्दीच्या समस्यांना पूर्णपणे आळा घातला. तसेच लाखो भाविकांच्या अन्न-पाणी, सुरक्षा आणि वाहतुकीची योग्य काळजी घेतली. अमेरिकेतील एलईडी लाईट्स डेटा चा उत्तम वापर करणारे लॉस एंजलिस, पर्यटकांच्या गर्दी नियंत्रणासाठी बिग डेटा आधारे विशिष्ट आकाराचे शांघाय मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम तसेच सौदी अरेबियातील हज यात्रेदरम्यान गर्दी नियंत्रणासाठी मक्का शहर ही बिग डेटाचा पुरेपूर लाभ घेणारी काही उदाहरणं.


#bigdata #sunilkhandbahale #innovation #technology #techtalks



---

Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message