TechTalks Series: 11 - Bike Sharing - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur

TechTalks Series: 11 - Bike Sharing - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur

Sunil Khandbahale - MIT Sloan Fellow, Innovator, Entrepreneur & Research Scholar
00:03:34
Link

About this episode

TechTalks Series: 11 - Bike Sharing - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur 


सायकल शेअरिंग म्हणजे अल्प काळासाठी व्यक्तिगत वापराकरिता सायकल उपलब्ध करून देणारी सेवा. यामध्ये शहरभर सायकल तळांचे जाळे पसरविले जाते. मासिक अथवा वार्षिक स्वरूपांत नागरिकांना नेटवर्कचे सभासदत्व घेता येते. पर्यटक तात्पुरते सभासद होऊन सेवेचा वापर करू शकतात. वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केलेल्या सायकल्स चोरीपासून सुरक्षित तसेच कमी देखभाल खर्चिक असतात. मिळालेल्या मास्टर-की अथवा सांकेतिक शब्दांचा म्हणजेच पासवर्ड वापर करून सभासद व्यक्ती कोणत्याही सायकल-तळावरून कोणतीही सायकल कधीही वापरू शकतो. सायकल शेअरिंग पर्यायाचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी सभासदत्व मूल्य अतिशय वाजवी आणि सर्वसामान्यांना परवडेल असे ठेवण्यात येते. पार्किंगचा खर्च आणि वाहने सांभाळण्याची जबाबदारी टाळण्यासाठी अनेक लोकं वैयक्तीक वाहने वापरण्यापेक्षा सायकल शेअरिंग नेटवर्कचा वापर करतात. युरोपातील ऍमस्टरडॅम येथे १९६५ साली सुरु झालेला अनोखा सायकल शेअरिंग उपक्रम आजमितीस जगभर पन्नास देशांत सातशे बारा शहरांनी अंगिकारला आहे. चाळीस हजार सायकलतळांवर असलेल्या जवळपास नऊ लाख सायकल शहरी भागांत सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य पर्याय म्हणून समोर येत आहे. परदेशांत मोठ्या संख्येने नागरिक सायकलचा नित्य वापर करताना दिसतात किंबहुना वाहतुकीच्या इतर पर्यायांपेक्षा त्यांना शेअरिंग सायकल अधिक सोयीची वाटते. तेथील सरकारं नागरिकांसाठी सायकल चालविण्याचा अनुभव अधिकाधिक आनंददायी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष सायकल रस्ते निर्मितीसोबतच ‘बाईक-टू-वर्क’, ‘बाईक-टू-स्कुल’ अशा उपक्रमानंर्गत सायकल संस्कृती रुजवत आहेत. तेथील उद्योजक आणि खासगी संस्था सायकल शेअरिंगकडे एक व्यावसायिक संधी म्हणून बघत आहेत. पॅरिसची वेलीब, वॊशिंग्टनची कॅपिटल बाईक, बोस्टनची हबवे, लॉस एंजेलिसची मेट्रो बाईक, न्ययॉर्कची सिटी बाईक, मिन्नेऑपोलिसची नाईसराईड, मॉन्ट्रिअलची बिक्सी, बर्लिनची कॉल-अ-बाईक, जपानची इको बाईक ह्या कंपन्या उत्तम व्यवसाय करत आहेत. शहरांतील मोक्याच्या ठिकाणी सायकलतळ असल्यामुळे सभासदत्वाच्या ठराविक कमाईसोबतच जाहिरातीच्या माध्यमातून आणि बिग डाटा च्या आधारे भरगोस नफा मिळतो. अनेकदा सायकल शेअरिंग नेटवर्कची सभोवतालच्या संस्था, उद्याने, संग्रहालये, खाजगी कंपन्या, बस-सेवा, रेल्वे, विमानतळ तसेच कार कंपन्यांसोबत भागीदारी असते. एक प्रकारे व्यवसाय वाढीसाठी आणि मुख्य वाहतूक व्यवस्थेस जोडण्यासाठी पूल सिस्टिम म्हणून त्या काम करतात. फ्रांसची विन्सी पार्क त्यांच्या वाहनतळावर गाडी लावल्यास आपल्या ग्राहकांना स्थानिक प्रवासाकरिता सायकल देतात. सॅन फ्रान्सिस्कोची सिटी कारशेअर कंपनीने इलेक्ट्रिक सायकल सुविधाही सुरु केली आहे. सायकल शेअरिंग हा पर्यावरणपूरक आणि आरोग्यवर्धक पर्याय म्हणून पुढे येत आहे.


#bikesharing #biking #sunilkhandbahale #techtalks #innovation #technology



---

Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message