TechTalks Series: 10 - Community Engagement - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur

TechTalks Series: 10 - Community Engagement - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur

Sunil Khandbahale - MIT Sloan Fellow, Innovator, Entrepreneur & Research Scholar
00:03:23
Link

About this episode

TechTalks Series: 10 - Community Engagement - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur 


अनेकदा असे पाहावयास मिळते की सरकार खूप खर्च करून मोठ्या प्रयत्नाने नागरिकहिताच्या काही सेवासुविधा देऊ करतात पण क्वचितच नागरिकांकडून त्यांचा उपयोग होतो. म्हणूनच जगभरातील सरकारे तेथील स्थानिक नागरिकांना मुख्य भागीदार (स्टेकहोल्डर) या नात्याने विकास प्रक्रियेच्या आरंभीपासूनच समाविष्ट करून घेण्यास आग्रही दिसतात. कचरा व्यवस्थापनातून ऊर्जा व इंधन तसेच खत निर्मिती, अक्षयउर्जेची साधने, पर्याय व त्यांची देखभाल, इ-गव्हर्नन्सद्वारे सार्वजनिक माहिती, सुरक्षितेतच्या उपाययोजना व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व्हिडीओ क्राईम मॉनिटरिंग यासोबतच नागरिकांचे कान, डोळे यांची मदत, स्मार्ट मीटर्स, पाणी गळती व पाण्याचा अपव्यय थांबिण्यासाठी पाणी व्यवस्थापन तसेच सांडपाण्याचे नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकतम वापर, स्मार्ट पार्किंग तसेच टेली-मेडिसिनसह डिजिटल शिक्षण अशा अनेक धोरणांच्या अंलबजावणीसाठी तंत्रज्ञानासोबतच लोकसहभाग निर्णायक ठरणार आहे. विकासासाठी लोकांकडूनच वेगवेगळ्या सूचना मागविणे, नवनवीन कप्लना मागविणे, अनेक महत्वाच्या धोरणांवर नागरिकांची मते जाणून घेणे, हरकती मागविणे, कला उपक्रम (आर्ट प्रोजेक्ट्स), छायाचित्र स्पर्धा, डिझाईन, संशोधन स्पर्धा, चर्चासत्रे व परिषदा भरविणे अशा काही उपक्रमांमधून लोकसहभागास प्रोत्सहन देणे असे अनेक प्रयोग जगभरात ठिकठिकाणी राबविले जाऊ लागले आहेत. सक्रिय सहभागामुळे नागरिकांमध्ये सार्वजनिक मालमत्तेविषयी मालकीयत्वाची भावना तर निर्माण होतेच शिवाय उपक्रमांची अमलबजावणी करण्यासाठी व भविष्यातील देखभालीसाठीही नागरिकांचे सहकार्य प्राप्त होते. लोकसहभागाची जगभरात अनेक उत्तम उदाहरणे आहेत. आणीबाणीप्रसंगी उपयोगात येणारी अमेरिकेतील ३-१-१ सेवा, स्थानिक तक्रार नोंदणीसाठी फिनलॅंडची फोरम व्हिरिअम हेलसिंकी सेवा, ऑस्ट्रेलियाची बुश टेलिग्राफ, कॅनडास्थित स्प्रिंगटाइड ही संस्था तेथील प्रशासनासोबत सरकारी धोरणं निश्चित करण्यास मदत करतात व लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी राजकारणाचे नवीन आदर्श ठेवत आहेत. अमेरिकेतील बस प्रोजेक्ट हा डावे किंवा उजवे असे राजकारण न करता फक्त भविष्यवेधी अमेरिका घडविण्यासाठी नेतृत्व तयार करत आहे. सिटीझन इन्व्हेस्टर ही संस्था सामाजिक प्रकल्पांमध्ये लोकसहभागातून गुंतवणूक करते. अमेरिकेतील ओपन टाऊन हॉल ही अशीच एक संकल्पना आहे जिथे नागरिक सरकारी धोरणांवर बेधडक टिकाटिप्पणी करू शकतात. ब्रिटनमधील ‘फिक्स माय स्ट्रीट’, क्रिएट फ्रँकफर्ट, नेदरलॅंडचे स्मार्ट सिटिझन्स, न्यूझीलण्डची सेन्सिंग सिटी, इटलीची मॉनिटरिंग मॅरेथॉन असे कितीतरी उदाहरणे देता येतील. सकारात्मक लोकसहभागाची आणखी एक चांगले आणि ओळखीचे उदाहरण म्हणजे कुंभथॉन. कुंभमेळ्यातील अनेक जटिल अडचणी सोडविण्यासाठी शहरातील शाळा-महाविद्यालये, तंत्रज्ञ आणि नागरिक यांनी एकत्रित घेतलेला पुढाकार.


#communityengagement #sunilkhandbahale #techtalks #technology #innovation



---

Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message