TechTalks Series: 08 - Municipal Wireless Network - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur

TechTalks Series: 08 - Municipal Wireless Network - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur

Sunil Khandbahale - MIT Sloan Fellow, Innovator, Entrepreneur & Research Scholar
00:03:28
Link

About this episode

TechTalks Series: 08 - Municipal Wireless Network - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur 


महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी बिनतारी इंटरनेट जाळे निर्माण करून नागरिकांना मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे यालाच ‘म्युनिसिपल वायरलेस नेटवर्क’ असे म्हणतात. अमेरिकेसह इतर प्रगत देशांत सब-वे, रेल्वे स्टेशन, बस स्थानकं, धावती वाहनं, वाचनालयं, दवाखाने, विद्यापीठं, चौका-चौकात, अगदी सगळीकडं वायफाय इंटरनेट उपलब्ध असतं. तेथील नागरिक मोफत इंटरनेट असलेल्या रेस्टोरंट मध्ये जेवण घेणं पसंत करतात. व्हर्चुअल जगात वावरणारा तरुण वर्ग कॉफी पिण्यासाठी स्टारबक्स आणि पिझ्झा-बर्गर खाण्यासाठी मॅक्डोनाल्डमध्ये गर्दी करताना दिसतो. मोफत वायफाय इंटरनेट ही स्टारबक्स, मॅक्डोनाल्ड सारख्या खाजगी ब्रॅण्डची एक यशस्वी व्यवसायनीतीच ठरली आहे. मोफत इंटरनेट सुविधा पुरविल्यानं अनेक व्यावसायिकांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. एका सर्वेक्षणात ६२ टक्के व्यावसायिकांनी सांगितलं, की वायफाय क्षेत्र असलेल्या ठिकाणी त्यांचे ग्राहक अधिक वेळ घालवतात आणि ५० टक्के व्यावसायिकांनी सांगितलं, की त्यांचे ग्राहक मोफत इंटरनेट सुविधा सुरु केल्यापासून अधिक खर्च करतात. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणं, अधिभार मूल्य आकारणं आणि संलग्न उत्पादन-सुविधा विक्री यातून अनेक हुशार व्यावसायिक नफा मिळवत आहेत. नागरिकांची मागणी आणि खाजगी सेवा पुरवठादारांचे हे कौशल्य लक्षात घेता अनेक देशांच्या सरकारी यंत्रणा देखील ‘म्युनिसिपल वायरलेस नेटवर्क’ चा गांभीर्याने विचार करू लागले आहेत. शहरभर वायफाय जाळे पसरविल्यानं, नागरिक सरकारी सेवांचा जास्तीत जास्त वापर करतील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतील, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, नवसंशोधन वाढीस लागेल, पर्यटन व्यवसायास चालना मिळेल. शहरातील महत्वाची स्थळं, वास्तु, संग्रहालयं, सार्वजनिक प्रेक्षणीय ठिकाणं, शहरात कधी-कोठे-काय घडामोडी, वाहतूक दर आणि वेळापत्रक, बँक-एटीम तसेच दवाखाने, शाळा-महाविद्यालयं, बाजारपेठा, जवळचे मॉल्स, नाट्यगृह आणि इतर महत्वाच्या माहितीपर अथवा मनोरंजनात्म्क घटना यांची माहिती देता येते. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी प्रत्यक्षदर्शी माहिती मिळविण्याचा तो एक सुखद अनुभव तर ठरतोच शिवाय शहरी सामाजिक बौद्धिक आणि आर्थिक विकास वाढीस लागतो. शहराचा सर्वांगीण विकास आराखडा बनविताना अधिकतम माहिती महत्वाची असते. अशा वेळी म्युनिसिपल वायरलेस इंटरनेट च्या माध्यमातून उपलब्ध डेटाचे विश्लेषण करून नागरिकांच्या हिताच्या योजना बनविण्यास मदत होईल. अनेक शहरं वायफाय-सिटी असं स्वतःचं वैशिष्ट्य म्हणजेच ब्रॅंड दाखवून देश-विदेशातून गुंतवणूक आकर्षित करत आहेत. म्युनिसिपल वायरलेस इंटरनेटमुळे प्रशासनाचा जनसंवाद तर वाढेलच शिवाय जाहिरात आणि बिग डेटा च्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचे नवीन साधन देखील निर्माण होईल.


#muncipalwirelessnetwork #sunilkhandbahale #techtalks #innovation #technology



---

Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message