Episode 483 as on 20th February 2026
20 February 2026

Episode 483 as on 20th February 2026

Guru Shishya Sukhsamwad

About

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 20th February 2026

प्रेम शुध्द सहज तुझे आतुर तूचि द्यावया। आपुलेपणाने मज लाविसी तू घ्यावया। प्रेमाची आपुलकी मजसी ती कळू दे। देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ तो दत्तजयंतीचा आनंद सोहळा होता. अशा मोठ्या कार्यक्रमात प्रभू काही भक्तमंडळींना बोलायची संधी देत. त्या दिवशी प्रभूंचे परमभक्त भाऊ वैद्य बोलणार  होते. पण त्यांना शहापूरहून यायला उशीर होत होता. वेळ भरून काढण्यासाठी मला मनोगत व्यक्त करण्याची अचानक संधी मिळाली. मी आनंदाने भारावून गेलो व बोलता बोलता बोलून गेलो  की ' प्रभू तुम्ही कोणत्या नात्याने  आमच्यावर एवढे निरलस प्रेम  करता ? आम्ही आपले कोण लागतो ? हम आपके हैं कौन ?' प्रभूंनी मला लगोलग सावध केले . " जे ईश्वरत्व माझ्या ठिकाणी आहे त्याच ईश्वराचा अंश तुमच्या ठिकाणी आहे. आम्ही तुमच्याकडे  ईश्वरीदृष्टीने पहातो आणि तो ईश्वरी अंश आम्हाला लख्खपणे दिसत असतो. जीवाला ईश्वरी तत्त्वाचा विसर पडला म्हणून गुरूमंत्राचा संस्कार करून बाह्यांगाने आम्ही ते नाते पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या ठिकाणी जेव्हा सद्गुरूंवरील  प्रेमाची भावना जागृत होईल तेव्हा तुम्हाला या संबंधांचे मूल्य लक्षात येईल . आमच्या चरणाशी आलेले सर्व प्रेमीजन हे माझेच अंश आहेत व म्हणून माझे त्यांचेवरील प्रेम नैसर्गिक आहे . ईश्वराविषयी प्रेमभावना जागृत झाली आणि त्या प्रेमाचे भक्तीत रुपांतर झाले की मग  प्रेमीजनांच्याही  लक्षात येईल की देवभक्त संबंधात ' हम आपके हैं कौन ' हा विचारच अप्रस्तुत व गैरलागू आहे. " मला फारसे काही कळले नाही पण प्रभूंचे आपल्यावर आत्यंतिक प्रेम आहे . आपल्या ठिकाणी तशी प्रेमभावना  उगम पावण्यासाठी प्रभूंच्या संपर्कात सातत्य राखणे आवश्यक आहे हा भाव अधिक दृढ झाला . प्रेमाची आपुलकी मजसी ती कळू दे . देवा तुझ्या प्रेमाचा... श्रीपरमानंदार्पणमस्तु