
About
Guru Shishya Sukhanandsamwad as on 13th January 2026
तू रंगता प्रेम माझे रंगे । प्रेमअनुभव येई सर्व अंगे । रमूनी रंगणे तोचि माझा छंद। देवा तुझ्या प्रेमाचा मज लागे नाद ॥ वासना व अहंकारामुळे जीवाला दु:ख आहे. सुखाच्या मृगजळामागे धावता धावता दु:खच उगाळले जाते. मूर्तितल्या देवाचा धावा करून दु:ख तेवढ्यापुरते दूर होते पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. अनुभवाने हे पटल्यानंतर मी शांति व समाधानाच्या शोधात निघालो व कर्मधर्मसंयोगाने व भाग्याने प्रभूंची भेट झाली व होत राहिली. दु:खापेक्षा दु:खाचे मूळ आहिस्ता आहिस्ता दूर करणारे त्यांचे प्रेम व आपुलकी मनाला स्पर्श करत गेली व प्रेमाची गोडी निर्माण झाली. मनात त्यांच्या प्रेमाचा अंकुर फुटला . भेटीत तुष्टता मोठी . ऋणानुबंधाच्या या गाठी . देवा तुझ्या प्रेमाचा ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.