
About
Guru Shishya Sukhanandsamwad as on 9th January 2026
सहवास तुझा अती प्रिय होई। जवळीक तुझी स्मरणात राही। प्रेमी रमणे झाला माझा तो छंद। देवा तुझ्या प्रेमाचा मज लागे नाद ॥ अनावश्यक विचार व कर्मे देहबुध्दीला पोषक आहेत .देहबुद्धी ती आत्मबुध्दी करावी . आता देहबुद्धी आत्मबुध्दी करायची म्हणजे नेमके काय करायचं ? अनावश्यक विचार व कर्म करण्याची प्रवृत्ती जसजशी मनातून हद्दपार होत जाईल तसतशी देहबुध्दी मंद होत जाईल व आत्मबुध्दी जागृत व्हायला सुरुवात होईल . इथे प्रभू एक सोपा मंत्र सांगत. अमुक एक कर्म मीच , करायलाच, पाहिजेच का या तिन्ही प्रश्नांचे होय आले तरच ते कर्म करा. या मंत्रानेच एरवी दुर्गम वाटणारे जीवन सहज होत गेले . देवा तुझ्या प्रेमाचा .. श्रीपरमानंदर्पणमस्तु .