Episode 470 as on 6th January 2026
06 January 2026

Episode 470 as on 6th January 2026

Guru Shishya Sukhsamwad

About

Guru Shishya Sukhanandsamwad as on 6th January 2026


प्रेमात रमणे तुझा अनुभव। प्रेम रंगविणे तुझा तो स्वभाव। म्हणूनी प्रेमे घातली मज साद। देवा तुझ्या प्रेमाचा मज लागे नाद ॥प्रभू रामाच्या भेटीच्या ध्यासातून   रामदासस्वामींनी मनाचे श्लोक लिहीले . महाराजांनी मात्र या श्लोकांवर भाष्य करून जीवाला संसारभावातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. परमानंदप्रभूंनी आपल्या वचनांनी हा मार्ग अधिक प्रशस्त केला . मनोविजय ग्रंथाचे नुसते वाचन न करता त्या अनुषंगाने तुमचा भाव प्रकट करा . तुम्ही जसा जसा तुमचा भाव प्रकट करत जाल तशी तशी तुमची सद्गुरुंवरील श्रध्दा व या मार्गावरील बांधिलकी वाढत जाईल. संसारभाव कमी कमी होत जाईल असे सांगितले. श्रीपरमानंदार्पणमस्तु.