Episode 509 as on 22nd May 2026
22 May 2026

Episode 509 as on 22nd May 2026

Guru Shishya Sukhaanandsamwad

About

Guru Shishya Sukhanandsamwad as on 22nd May 2026

सुप्रभात, एक जीव दुसर्‍या जीवाचा अहंकार घ्यायला तयार नसतो कारण प्रत्येकाकडे तो ओतप्रोत भरलेला आहे .जीवाची गंमत अशी आहे त्याला अहंकाराचा त्याग करायचा नाही तर  दुसर्‍या जीवावर गाजवायचा आहे म्हणून दुःख आहे . संतसत्पुरुषाच्या सहवासात त्याचा अहंकार क्षीण होऊ शकतो पण पूर्णपणे विलयाला जात नाही . म्हणून भक्ती घडत नाही व आनंदाचा अनुभव नाही. आनंद व अहंकार एकाच म्यानात ( मनात )राहू शकत नाहीत. अहंकाराचा पूर्णपणे त्याग हीच भक्तीची सुरुवात. जय परमानंद 🙏🙏🙏

सुप्रभात  , मना सज्जना भक्तिपंथेचि यावे. या पंथाचे लक्ष्य प्रभूंचे अंतःकरण आहे. प्रभू सांगतात या पंथावर मार्गक्रमण करत असताना प्रतिकूल मनःस्थितीतही थांबू नये व अनुकूल मनःस्थितीतही स्वस्थ बसू नये.  माझी मनस्थिती सावरण्याकरता तर प्रभू संगे संगे चालत आहेत. म्हणून परस्परांचा हात हातात धरून हा आनंददायी प्रवास अंतिम लक्ष्याच्या दिशेने चालू राहू दे . चरैवेति चरैवेति हेच या आनंदमार्गाचे मर्म आहे. जय परमानंद 🙏🙏🙏