Episode 505 as on 8th May 2026
08 May 2026

Episode 505 as on 8th May 2026

Guru Shishya Sukhaanandsamwad

About

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 8th May 2026

सुप्रभात, अर्जुनाचे आणि कृष्णाचे मैत्रीचे नाते होते. कृष्णाने अर्जुनाशी सख्यत्वाचे नाते जपले होते व ऐक्यत्वासाठी आतुर होता. सख्यत्वातून ऐक्यभावापर्यंत जाण्यासाठी दास्यत्व ( समर्पणभाव ) हे माध्यम आहे. 'माम् एकम् शरणम व्रज' असे कृष्णाने सांगूनही पाहिले. पण ना अर्जुनाने हे वचन गंभीरपणे घेतले ना कृष्णाने तसा आग्रह धरला. परिणामी अर्जुनाच्या जीवभावाने कृष्णभावावर मात केली व अर्जुन आत्मनिवेदनापासून वंचितच राहिला. जय परमानंद 🙏🙏🙏

सुप्रभात, देवळातला देव विचारपूस करत नाही. प्रदक्षिणा घातल्याने तो प्रसन्न झालाय किंवा कसे हे कळत नाही. प्रभूंना प्रदक्षिणा नकोत तर मनाची मोकळीक हवी. प्रभू विचारपूस करतात, प्रत्यक्ष संवाद होतो म्हणून विचारचक्र सुरू होते. हे सद्विचारचक्र जेव्हा मनात प्रवेश करते तेव्हा मनातील विकार दूर होतात व चिंतन व मनन सुरू होते. या चिंतनातूनच आपली विचारपूस करणाराच मानवदेहधारी ईश्वर आहे हा भाव दृढ होतो व भक्ती घडायला लागते . जय परमानंद 🙏🙏🙏