From Driverless Taxis to Gorilla Trekking... Most Incredible Travel Experiences by Dr. Sarita & Milind Davare
22 May 2026

From Driverless Taxis to Gorilla Trekking... Most Incredible Travel Experiences by Dr. Sarita & Milind Davare

Around The World

About
परफ्यूम्सपासून पेन मॅनेजमेंटपर्यंत, आणि तंत्रज्ञानापासून वन्यजीवनापर्यंत, मिलिंद डावरे आणि डॉ. सरिता डावरे यांचा प्रवास म्हणजे अनुभवांची आणि जिज्ञासेची सुंदर कहाणी आहे.

या भागात ते सांगतात की जगभरातील प्रवासांनी त्यांच्या विचारांना आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला कसा आकार दिला.

मिलिंद डावरे सांगतात की परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये ४५ वर्षे काम करताना त्यांना जगभर प्रवास करण्याची संधी मिळाली. कधी कधी घरी येऊन फक्त सुटकेस बदलून पुन्हा निघावं लागायचं.
 
डॉ. सरिता डावरे सांगतात की त्यांचं प्रवासप्रेम त्यांच्या पतीमुळे वाढलं आणि दर काही महिन्यांनी प्रवास करणं त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे.

हाँगकाँगमध्ये ११०व्या मजल्यावर राहण्याचा अनुभव, शेनझेनमधील ड्रायव्हरलेस टॅक्सी आणि ड्रोन डिलिव्हरी, तसेच केनिया, टांझानिया, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे येथील सफारी आणि गोरिला ट्रेकिंग, हा भाग तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल.
 
प्रवासात आहार कसा सांभाळायचा, ग्रीसमधील मजेशीर किस्से आणि फॉल सीझनमधील कॅनडाचं अप्रतिम सौंदर्य, या सगळ्या गोष्टी या गप्पांना अधिक खास बनवतात.

जर तुम्हाला प्रवास, तंत्रज्ञान, वन्यजीवन आणि खऱ्या अनुभवांच्या गोष्टी आवडत असतील, तर हा एपिसोड नक्की पाहा!

---------------

From perfumes to pain management, and from technology to wildlife, the journeys of Milind Davare and Dr. Sarita Davare are filled with curiosity and exploration.

In this episode, they share how travelling across the world has shaped their personalities and perspectives.

Milind Davare reflects on spending 45 years in the perfume industry and how his work took him around the globe. At times, he would return home only to swap suitcases and head out again.

Dr. Sarita Davare shares how her love for travel grew through her husband, and why taking a trip every few months is non-negotiable for them.
 
From staying on the 110th floor in Hong Kong to experiencing driverless taxis and drone deliveries in Shenzhen, their fascination for technology is as strong as their love for nature.

Their adventures include gorilla trekking, walking with lions and cheetahs, safaris across Kenya, Tanzania, Botswana, and Zimbabwe, and unforgettable moments at Victoria Falls.
 
They also share practical travel tips, how they maintain food discipline while travelling, funny stories from Greece, and why Canada in the fall feels absolutely magical.
 
If you love travel, wildlife, technology, and stories that spark curiosity, this episode is for you.