TechTalks Series: 09 - Community Solar - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur
15 May 2022

TechTalks Series: 09 - Community Solar - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur

KHANDBAHALE Podcast: with Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Innovator & Entrepreneur

About

TechTalks Series: 09 - Community Solar - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur 


ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार विश्वातील एकूण उर्जा कायम स्थिर आहे. ती केव्हाही नष्ट होणार नाही. मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होऊ शकते. म्हणूनच, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाबरोबरच आपल्याला दरडोई ऊर्जा वापर कमी करण्याचे नवनवीन मार्ग शोधायला हवेत. सूर्य हा अनादी काळापासून ऊर्जेचा मुख्य स्रोत राहिला आहे. ऊर्जेचे इतर स्रोत तोकडे पडत असताना, सोलर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सूर्यकिरणांच्या आधारे सौर-ऊर्जा निर्मिती यशस्वी ठरत आहे. परंतु सौरऊर्जा अजूनही प्रचंड महाग असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तसेच शहरी भागात जागेची कमतरता असते आणि अनेकदा खाजगी जागेवर यंत्रणा उभी करण्यास अडचणी येतात. यावर नामी उपाय म्हणजे ‘कम्युनिटी सोलर सिस्टम’ यालाच अनेकदा सौर-उद्यान किंवा सौर-शेत असेही म्हणतात ज्यामध्ये सरकारी अथवा खाजगी मिळकतीवर निर्माण केलेल्या सौरऊर्जेचा एकापेक्षा अधिक घरे सहकारी पद्धतीने वापर करतात. उपक्रमासाठी लागणारी जागा ही समुदायातील लोकांच्या मालकीची असणे बिलकुल गरजेचे नाही हा महत्वाचा मुद्दा. एखाद्या छोट्या आकाराच्या जागेत उभा केलेला सौरऊर्जा प्रकल्प हा त्या त्या समुदायाच्या मालकीचा असू शकतो किंवा पूर्णपणे खाजगी देखील असू शकतो. व्हर्चुअल नेट मीटरिंगच्या वापरामुळे, उपक्रमातून निर्माण झालेल्या एकूण ऊर्जेच्या समप्रमाणात समुदायातील प्रत्येक सभासदास वीजबिलामध्ये पैशांची बचत होते. कम्युनिटी सोलर ही नवीन संकल्पना असल्याने त्याकडे जगभर एक नवीन व्यावसायिक संधी म्हणून बघितले जात आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्रांतीमुळे येत्या काळात मानव वैयक्तिक तसेच सामूहिक वापरासाठी ऊर्जा निर्मितीसह सानुकूल आणि नियंत्रित ऊर्जा वापर (कस्टमाईझ्ड अँड कंट्रोल्ड एनर्जी कन्झमशन) साठी प्रयत्नशील आहे. अमेरिकास्थित मोझाईक नावाची कंपनी अशा प्रकारच्या कम्युनिटी सोलर उपक्रमांत गुंतवूणक करण्याची सुविधा पुरवते. अधिकाधिक लोकवस्तींनी कम्युनिटी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी सौर प्रकल्पांतील गुंतवूणकांवर करसवलतीसंह नागरिकांसाठी एकूण प्रक्रिया सोपी करत जगभरातील सरकारं प्रोत्साहन देत आहेत. फ्लोरिडा राज्यातील डेन्व्हर येथे किटसन आणि पार्टनर कंपनीने वर्ष २००६ मध्ये अमेरिकन सरकार, पर्यावरणवादी आणि आयबीएम तंत्रज्ञान कंपनीसोबत एकत्र येऊन तब्ब्ल एक्याण्णव हजार एकरांवर तयार केलेला बॅबकॉक रँच नावाचा अमेरिकेतील पहिला अद्ययावत कम्युनिटी सोलर उपक्रम उभा केला. अमेरिकेत वुई-सन-अलायन्स, मायक्रोग्रीड आणि क्लीन-कोईलन्स सारख्या कंपन्या कनेक्टिकट, मॅसॅचूसेट्स, न्यूजर्सी आणि पेनसिल्व्हेनिया या राज्यांत कार्बन उत्सर्जन कमी करून अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. मेरीलँड येथील युनिव्हर्सिटी पार्क कम्युनिटी सोलर उपक्रम, कोलोरॅडो येथील क्लीन-एनर्जी-कलेक्टिव्ह, कॅलिफोर्नियाचे सोलरशेअर अशी कम्युनिटी सौरऊर्जेची अनेक यशस्वी उदाहरणं आहेत.


#communitysolar #sunilkhandbahale #technology #innovation #techtalks



---

Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message